परतीच्या पावसाने कापसाच्या झाल्या वाती

Foto
शेतकऱ्याचे डोळे नुकसान भरपाईकडे

वाळूज महानगर, (प्रतिनिधी) अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. साधारणत तालुक्यात ७५ हजार हेक्टरवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यातच पिकांचे अक्षरशः अतोनात नुकसान झाले. काटेपिंपळगावातील पिकांचे शिवना नदीच्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच आता जाता जाता पावसाने शेतकऱ्यांची दैना केली आहे.

मागील महिन्यात झालेल्या पावसाने कापूस, एका, सोयाबीन, तूर, उसांचे प्रचंड नुकसान झाले. डीफार पिके काढणीला आली तर ऑक्टोबरच्या वटच्या आठवडयात अवकाळी पावसाने ते नव्हते पिकांचे प्रचंड़ नुकसान केले. शेतात जो आहे कापूस तो व्यापारी भिजलेला म्हणून कमी भावात घेत आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी जो कांदा ठेवला त्याला व्यापारी कवडीमोल भावान घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी प्रचंड दुख तसेच दुहेरी संकटात सापडला आहे. थोडक्यात काय तर दिवाळी झाली तरीही हातात एक रुपया पडला नसल्याचे शेतकरी सांगतात.
मदतीची प्रतिक्षा : 
सप्टेंबर महिन्यात मुसळधार झालेल्या पावसाने पीक नुकसानीचे पंचनामे झाले. त्याचे पैसे दिवाळी अगोदरच सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार होते. दिवाळी होऊन १० दिवसांपेक्षा जास्त कालावधी हो आला. तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून दमडीदेखील आलेली नाही. शेतकऱ्यांनी यावर्षी दिवाळीच साजरी केलेली नाही. त्याला वाटले होते, पैसे जमा होतील पण ते नाही झाले. तसेच कापसावर भिस्त होती तर ऐन दिवाळीत पाऊस पडला आणि राहीलेल्या कापसाच्या वाती झाल्या.
पशुधनाचेही मोठे नुकसान : 
गोदावरी नदी काठची नेवरगाव, हैबतपूर, अगरकानडगाव, ममदापूर, बगडी, जामगाव आदी गावातील शेतजमिनीची परिस्थिती खुपच भयानक आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमधील मुसळधार पावसाने या गावातील पिकांचे प्रचंड नुकसान झालेच होते. काही घरांची पडझड झाली. पशुचनांचे नुकसान झाले होते. तसेच नदीकाठच्या ज्या जमिनी आहेत त्या अक्षरशः पाण्यामुळे नापिक झाल्या आहेत. कारण पैठण चरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने बॅकवॉटरवे अधिक पावसाचे पाणी शेतात साचले. सर्वत्र पाणीच पाणी त्यामुळे नदी काठचा शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. दरम्यान, नदी काठच्या शेतकऱ्यांना वेगळा निकष लावून भरीव मदत करावी व आमच्या ज्या शेतजमिनी नापिक होत आहेत. याचा मोबदला द्यावा व यावर उपाययोजना करावी, असा सूर शेतकऱ्यांचा आहे.